सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेने राबविलेल्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे तीन तेरा (देवगड तालुका)

सिंधुदूर्ग जिल्हा परिषद केव्हा आदर्शाच्या विषयी चर्चेत तर केव्हा भ्रष्टाचाराच्या विषयी चर्चेत हा आता प्रथेचा भाग झाला आहे.त्यातील सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन विभागाने केलेला भ्रष्टाचार त्यातील हा एक भाग आहे. ,सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात फक्त तीन नगर परिषद व पाच नगर पंचायत ही शासकीय कार्यालया सोडून बाकी संपूर्ण जिल्हा भ्रष्टाचाराच्या भोव-यात सापडले आहे.
            स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेने प्रत्येक महसुली गावात शाळेच्या भिंतीवर तसेच सार्वजनिक  ठिकाणी स्वागत फलके आॕलियपेंडने भिंतीवर चित्रकार मार्फत रंगकाम करायचे होते. 
             पंरतु चाणक्य बुद्धिमान असलेले अधिकारी वर्ग आपल्या पंचायत समितीच्या व ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक  कार्यालयातील २ व ३ श्रेणीतील  कर्मचाऱ्यांना हाताशी धरून खोटेच काम करायचे असे मानाशी बाळगून प्रत्येक  पंचायतीने एकच ठेकेदारांनकडून चुकीच्या पद्धतीने फलके बनवून घेतली.
            मी दिनांक १० /०८ / २०१९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सिंधुदूर्ग यांच्याशी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत भिंतीवरील फलके व  स्वागत  फलकांमध्ये भ्रष्टाचार झाला त्याबाबत मॕडमसाहेब यांच्याशी चर्चा केली. आणि भ्रष्टाचार झाल्याचे उघडीस आले. त्या देवगड तालुक्यातील ज्वलंत हे एक उदाहरण आहे सविस्तर लिहायचे होते.पण चार पाच महिन्यामध्ये सविस्तर  लिहिले होते. अजून प्रकरण कार्यवाही चालू आहे.

Comments