सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड पंचायत समितीने केलेल्या कामाची चौकशी होणार.

                सिंधुदूर्ग जिल्हा नेहमी प्रमाणे देशात किंवा राज्यात नाहीतर कोकण विभागात योजनेमध्ये प्रथम क्रमांकावर असतो. 
               त्याच प्रमाणे राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत सुध्दा चुकीच्या माध्यमातून काम करणारा जिल्हा म्हणून   प्रथम आहे.कारण सिंधुदूर्गातील देवगड पंचायत समितीने रोजगार हमी योजनेमार्फत आजपर्यंत घेतलेली कामे कायद्याला बगल देऊन चुकीच्या निकषाने हाती घेतलेले काही कामे सिद्ध  झाली आहेत.
                सर्व प्रथम काही गावाचा विकास व्हावा म्हणून रस्त्याची कामे हाती घेतलेली आढळतात .पण       ब-याचस्या कामामध्ये अनियमिता आढळून आलेल्या आहेत.जी रस्त्याची कामे हाती घेतलेली आहेत.रस्त्याचा जुना २६ नंबर व आताचा नवीन २३ नंबर आहेत.ते बरेचसे चुकीच्या माध्यमातून घेतलेले आहेत.
              तसेच विहिरी संदर्भात तेच आहेत.कारण ज्या बागा जुण्या आहेत त्या बागेत मुळात पूर्वीपासून होत्या. त्या पुन्हा आराखड्यात घेतले.आणि त्या लाभांर्थीला नव्याने बांधून दिलेल्या आहेत.तसेच सर्व निकष धाब्यावर बसवून लाभांर्थी निवड करतात.तसेच बरेच विहिरीत लाल फितीत अडकले आहेत.
                त्याच प्रमाणे सिंधुदूर्ग जिल्ह्यात एकमेव देवगड पंचायत समिती आहे.त्या पंचायत समितीने देशातील सर्व कायदे वाकवून रोजगार हमी योजनेनी जी कामे शासन दरबारी  आराखड्यातच मान्यता अशी कामे पैसे खाण्यासाठी चक्क हाती घेतली.ती भ्रष्टाचाराच्या  भोव-यात मिळाली.आणि त्याची सखोल चौकशी होत आहे.तसेच काही कामात शाखा अभियंता यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला आहे.
                 तसेच महाराष्ट्र विधिमंडळात अधिवेशन काळात काही तारंकित प्रश्न ठराविक आमदारांनी उपस्थित केले होते.त्या सभाग्रहाला देवगड पंचायत समितीने चुकीची माहिती पुरवली आहे.म्हणून सभागृहाने माहिती चुकीच्या पाठवून सभागृहाचा अवमान केल्याचा ठपका ठेवला तसेच लोक प्रतिनिधी यांची सुध्दा फसवणूक केली.म्हणून सखोल चौकशी होणार एवढे नक्की.
      (चुकीचे कामे म्हणजे ही योजना रोजगार हमी योजना परीपत्रकात नसताना सुध्दा देवगड तालुक्यात आमलात आणली आणि तेथेच धुपप्रती बंधा-यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची घंटा वाजली. ) 

Comments